शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा लसवंत होण्यास लागतील दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नागरिकांना अक्षरश: पायपीट करावी लागत आहे. पहिला डोस घेतलेल्या जिल्ह्यातील ८ ...

-------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नागरिकांना अक्षरश: पायपीट करावी लागत आहे. पहिला डोस घेतलेल्या जिल्ह्यातील ८ लाख ८५ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळेना. तसेच पहिला डोस घेण्यासाठीही गर्दी होते आहे. गेल्या सात महिन्यांत ११ लाख नागरिकांना लस देण्यात आली असून,लसीकरणाची गती अशीच राहिल्यास संपूर्ण लसीकरण होण्यास पुढील दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखायची कशी असा प्रश्न नागरिकच उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यातील ३८ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरण मोहीम सुरू होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी तळालाच आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, केंद्राकडून मुबलक लस उपलब्ध होत नाही. मागणीच्या प्रमाणात खूपच कमी प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने आठवड्यातील काही दिवस लसीकरणच बंद ठेवण्याची वेळ जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर येत आहे. लस उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचीही अडचण झाली असून, त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

....

१६० केंद्रांवर लसीकरण

शहरासह जिल्ह्यातील १६० लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येते. जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि महापालिकांकडून लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. दररोज ५ ते ६ हजार डोस मिळतात. हा आकडा जरी मोठा दिसत असला तरी एका केंद्रावर साधारणपणे २० ते ३० डोस उपलब्ध होतात. तुलनेत लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही ५ ते १० पट आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.

.....

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस

हेल्थलाईन वर्कर- ४४ हजार ८७७

फ्रंटलाईन वर्कर- ५९ हजार १०२

१८ ते ४५- २ लाख ५ हजार ७०९

४५ ते ६०- २ लाख ९३ हजार ४७६

६० पेक्षा अधिक- २ लाख ८२ हजार १२३

.....

दुसरा डोस

हेल्थलाईन वर्कर- ३४ हजार ७७१

फ्रंटलाईन वर्कर- २७ हजार ३३१

१८ ते ४५- १७ हजार ४१८

४५ ते ६०- १ लाख ६ हजार २२३

६० पेक्षा अधिक- १ लाख २५ हजार ५०५

....

हा तर त्रास देण्याचाच प्रकार

शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर लस मिळत नसल्याने हा तर त्रास देण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सरकारकडून लसीकरणाचा केवळ गाजावाजा केला जात असून, प्रत्यक्षात तीन महिने उलटूनही नागरिकांना वाट पाहावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

...

केंद्रांबाहेर पहाटेपासूनच रांगा

नगर शहरातील लसीकरण केंद्रांवर पहाटेपासूनच नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. परंतु, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. आरोग्य केंद्रातून टोकन दिले जाते. परंतु, नंबर येईपर्यंत लस संपलेली असते. त्यामुळे नागरिकांना लस न घेता परत जावे लागत असल्याने नाराजीचा सूर आहे.

...