धकाधकीच्या जीवनात भविष्य सुरक्षित असणे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:30+5:302021-09-24T04:24:30+5:30
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुल (दादा) मधुकरराव टेके-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय ...

धकाधकीच्या जीवनात भविष्य सुरक्षित असणे महत्त्वाचे
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुल (दादा) मधुकरराव टेके-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय डाक विभाग, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (दि. २२) सकाळी भारतीय डाक विभागाच्या विविध योजना, सेवा सुविधा याविषयी मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी कोपरगावचे डाक निरीक्षक विनायक शिंदे यांनीदेखील डाक विभागाच्या बचतीच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. डॉ. सर्जेराव टेके यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे सदस्य मधुकर टेके, माजी सभापती मच्छिंद्र टेके, सरपंच सतीश कानडे, वारी सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकरराव टेके, कोपरगाव डाक निरीक्षक विनायक शिंदे, विकास अधिकारी विजय कोल्हे, डाक आवेक्षक अर्जुन मोरे, संजय ढेपले, पोस्ट मास्तर विजय ठाकरे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, सेवानिवृत्त अधिकारी एम. के. टेके, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक छबूराव पाळंदे, वारी शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव कराळे, कृषी सहायक तुषार वसईकर, सुवर्णा गजभिव, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, शिंगवे येथील रामभाऊ बाभुळके, नितीन चौधरी उपस्थित होते.
230921\img-20210923-wa0037.jpg
फोटो२३- वारी डाक विभाग मार्गदर्शन - कोपरगाव