यंदाच्या बैलपोळ्यावर महागाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:49+5:302021-09-06T04:24:49+5:30

बैल पोळा सजावटीच्या साहित्याची खरेदी सुरू आहे. बैल पोळ्यासाठी लागणारे साहित्य सूत, रेशमी सूत, नायलाॅन दोरी, तर सजावट करण्यासाठी ...

Inflation crisis on this year's bullpen | यंदाच्या बैलपोळ्यावर महागाईचे संकट

यंदाच्या बैलपोळ्यावर महागाईचे संकट

बैल पोळा सजावटीच्या साहित्याची खरेदी सुरू आहे. बैल पोळ्यासाठी लागणारे साहित्य सूत, रेशमी सूत, नायलाॅन दोरी, तर सजावट करण्यासाठी कलर, फुगे, गोंडे, बाशिंग, घुंगराची माळ गेल्या वर्षीच्या तुलनेत महागले आहेत. बिजापूर भागातून सूत येते. त्याठिकाणी महापुराचे सावट ओढवल्याने साहित्य वाहून गेले. त्यामुळे व्यापाऱ्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सजावटीच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. बैलाबरोबरच शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे आदी पाळीव प्राण्यांची सजावट करतात. बैलाची सजावट करून त्याची मिरवणूक काढली जाते.

................

पुरामुळे उत्पादित झालेले साहित्य पुरात वाहून गेल्याने पुरेशा प्रमाणात सजावटीचे साहित्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे यंदा सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

-अनिल कासार, व्यापारी, राहुरी

................

झालर, बाशिंग, गजरे, शिंदोरी, वेसण, कलर, घुंगरमाळ, पितळी तोडा, घोगर आदी बैलाचे साज गेल्या वर्षीपेक्षा महाग झाले. गेल्या वर्षीपेक्षा महाग असले तरी शेतकरी असल्याने पोळ्याचा सण साजरा करतोच.

- रवींद्र म्हसे, शेतकरी, कोंढवड, राहुरी

...............

फोटो - राहुरी पोळा

बैलपोळा सणानिमित्त राहुरीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांची बैल सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

050921\img-20210904-wa0029.jpg

यंदाच्या बैलपोळा सणावर वर महागाईचे संकट ,महापुरामुळे सजावटीच्या सामनाचे दर भडकले

Web Title: Inflation crisis on this year's bullpen