बहिरोबावाडी येथे साने गुरुजी बालभवनचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:33+5:302021-07-11T04:16:33+5:30
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथे साने गुरुजी बालभवनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने ...

बहिरोबावाडी येथे साने गुरुजी बालभवनचे उद्घाटन
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथे साने गुरुजी बालभवनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांच्या उपस्थितीत तसेच बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल आणि कर्जत तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा दल साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन केले. विठ्ठल तोरडमल यांनी बालभवन व आमदार पाटील यांची माहिती दिली. भाऊसाहेब रानमाळ म्हणाले, लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. बालभवनासाठी पुस्तके भेट देण्याचे त्यांनी घोषित केले. सूत्रसंचालन विठ्ठल तोरडमल यांनी केले. तात्या तोरडमल यांनी आभार मानले.