गुहा, देवळाली येथे अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:37+5:302021-07-13T04:06:37+5:30

धंद्यांवर पोलिसांचे छापे राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयांची मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना ताजी ...

Illegal at Guha, Deolali | गुहा, देवळाली येथे अवैध

गुहा, देवळाली येथे अवैध

धंद्यांवर पोलिसांचे छापे

राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयांची मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना ताजी असताना रविवारी पुन्हा पोलिसांनी गुहा व देवळाली परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकला. अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी रविवारी (दि.११) गुहा तसेच देवळाली परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी आरोपी रमेश रघुनाथ वर्पे, सोमनाथ महादेव बर्डे, अजय रामराव जाधव या तिघांवर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दुधाळ हे रूजू झाल्यापासून त्यांनी अवैध दारू अड्ड्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Web Title: Illegal at Guha, Deolali