शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने बनवाबनवी केली तर आम्ही अण्णांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

पारनेर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण ...

पारनेर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.

बच्चू कडू यांनी शनिवारी (दि. ३०) राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन एक तास राज्यातील शेती प्रश्नांविषयी हजारे यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शरद जोशी, शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, सुरेश पठारे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, अन्सार शेख आदी उपस्थित होते.

मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर अण्णांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर ऊर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. राज्य, जिल्हा बदलला की शेतीचे प्रश्न बदलतात. पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाल दीडपट हमीभाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.

हजारे म्हणाले, समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत, त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. मात्र, बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. हजारे यांच्या साध्या पत्राचीही दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारने केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीत पाठविले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. थोडा विश्वास ठेवावा लागतो. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात, यावर माझा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.