शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ईदगाह मैदान,मशीदीत होणार नमाज

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

अहमदनगर : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसातही बाजार हाऊसफुल्ल होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठीचा उत्साह दुणावला.

अहमदनगर : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसातही बाजार हाऊसफुल्ल होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठीचा उत्साह दुणावला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता यतीमखाना मशीदीचे प्रमुख मौलवी मुख्य नमाज अदा करणार आहेत. सामूहिक नमाज अदा करण्यासाठी कोठला येथील ईदगाह मैदान सज्ज झाले आहे. शहरातील सर्वात जुन्या मशीदींमध्येही नमाज अदा केला जाणार आहे. ईदनिमित्त मशीदी, घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.चंद्र दर्शनाने सुरू झालेली रोजाची चंद्र दर्शनानेच सांगता होत आहे. अरब राष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच ईद साजरी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे चंद्र दर्शन झाले नसले तरी ईद मंगळवारीच साजरी होईल. ईदच्या दिवशी उपवास केला जात नाही. सुका मेवा, शिर-खुरमा खाल्ल्यानंतरच मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी जाणार आहेत. मुरुम, लाल माती टाकून ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे. मैदानाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनातर्फे गुलाब देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत केले जाणार आहे.आत्म्याची शुद्धीनमाज पठणाने आत्म्याची शुद्धी केली जाते. रमजानच्या महिन्यामध्ये नमाज पठण केल्याने शंभर पटीने पुण्य वाढते, अशी धारणा आहे. कुरआन शरीफ या धर्मग्रंथाचे वाचनही याच महिन्यात करण्यात आले. यापठणामुळे अल्लाहची दुवा मिळते, असे युवा अभ्यासक शेख नबेद याने सांगितले. नमाज अदा करण्यासाठी जाताना प्रत्येकाच्या मनात ‘अल्ला हो अकबर’ अशी प्रार्थना केली जाते. हिजरी सणाच्या चौदाव्या शतकापासून रमजान साजरा केला जातो, असेही तो म्हणाला. मुलगा तेरा वर्षाचा झाला की नमाज पठण करणे हे त्याचे कर्तव्य ठरते.जाण्याचा एक मार्ग, येण्याचा दुसरामुस्लीम बांधव सामूहिक नमाज अदा करण्यासाठी एका रस्त्याने ईदगाह मैदानावर जाणार असून दुसऱ्या रस्त्याने घरी येणार आहेत. त्यामुळे ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मनपाने स्वच्छता केली आहे. तसेच पोलीसही तैनात केले आहेत. घरातून निघताना ते शिर-खुरमा खाऊनच नमाज अदा करतील. ईदच्या दिवशी उपवास केला जात नाही. प्रत्येकाच्या घरी शिर-खुरमा केला जातो. तो खाण्यासाठी मित्रमंडळी,नातेवाईकांना निमंत्रण दिले जाते. यामधून जातीय सलोखा वाढीस लागतो.शहरातील जुन्या मशिदीकापडबाजारातील बादशाह मशीद (मर्कज), पारशाखुंट, बाबा बंगाली मशीद, मिलिटरी मशीद, माळीवाडा मशीद, सर्जेपुरा येथील तांबोळी का कब्रस्तानजवळील मशीद (मर्कज), तख्ती दरवाजा (आशा टॉकिज) आदी मशीद सर्वात जुन्या आहेत. येथेही नमाज अदा केला जाणार आहे. शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये एक मशीद हे नगरचे खास वैशिष्ट्य आहे.