कोविड काळात सेवा पुरविणाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:35+5:302021-06-10T04:15:35+5:30

येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये श्रावक समाजाचे अध्यक्ष रमेश लोढा व प्रसाद पाटणी, तसेच कोविड काळात शहरात अन्नदान ...

Honoring those who served during the Kovid period | कोविड काळात सेवा पुरविणाऱ्यांचा सन्मान

कोविड काळात सेवा पुरविणाऱ्यांचा सन्मान

येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये श्रावक समाजाचे अध्यक्ष रमेश लोढा व प्रसाद पाटणी, तसेच कोविड काळात शहरात अन्नदान करणाऱ्या कल्याण कुंकूलोळ, विकी जैन, जीवन पांडे, जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष गौतम साबद्रा यांचा सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधितज्ञ भागचंद चुडीवाल हे होते. समाजाचे माजी उपाध्यक्ष सतीश गोधा, माजी अध्यक्ष अनिल पांडे, अध्यक्ष संजय कासलीवाल, उपाध्यक्ष सुहास चुडीवाल, विश्वस्त गुलाब झाजरी, प्रशांत पाटणी, महावीर काला, सुभाष चुडीवाल, नंदलाल पापडीवल, मनसुख चोरडिया, डॉ.सतीश कोठारी, अमित गांधी, संदीप शहा, ललित कोठारी, बाळू सुराणा, राहुल सोनी, प्रशांत पाटणी, सुनील कासलीवाल, प्रकाश पांडे, प्रशांत साबद्रा, संजय चुडीवाल, विलास कासलीवाल, सचिन चुडीवाल, निखिल कासलीवाल, राजेंद्र पांडे, भाजपचे मारुती बिंगले आदी उपस्थित होते.

यावेळी मनसुख चोरडिया, अनिल पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. जैन समाजाची दान करण्याची परंपरा चालविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुहास चुडीवाल यांनी केले. सूत्रसंचालन अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी केले, तर आभार गुलाब झाजरी यांनी मानले.

----

फोटो ०९जैन

ओळी : कोविड काळात विशेष कार्य करणारे रमेश लोढा, प्रसाद पाटणी व इतरांचा सत्कार करताना जैन समाज बांधव.

----

Web Title: Honoring those who served during the Kovid period