शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त सभासदांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST2021-03-23T04:21:25+5:302021-03-23T04:21:25+5:30

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या कोपरगाव शाखेच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील २०२० - २१ या वर्षात संस्थेच्या सभासदत्त्वातून सेवानिवृत्त ...

Honor of retired members of Shikshak Bank | शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त सभासदांचा गौरव

शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त सभासदांचा गौरव

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेच्या कोपरगाव शाखेच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील २०२० - २१ या वर्षात संस्थेच्या सभासदत्त्वातून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा कृतज्ञता सोहळा तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच कोपरगाव येथे झाला.

अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष चांगदेव खेमनर होते. संचालक कैलास राहणे, कल्याण होन, बाळासाहेब सोनवणे, नारायण बारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चांगदेव खेमनर, कैलास रहाणे, सेवानिवृत्त सभासद रियाज शेख, संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्यात संस्थेच्या सेवानिवृत्त १५ सभासदांना १२ हजार ५०० व सभासदांना सेवाकाळात पुरोगामी कन्यादान योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा आठ सभासदांना प्रत्येकी १५ हजार असे धनादेश देण्यात आले. सभासदांच्या सहा गुणवंत पाल्यांचाही संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक बाळासाहेब सोनावणे यांनी केले. नारायण बारे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी नितीन होन, सागर सातपुते, विकास पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी संदीप जगझाप, कैलास सातपुते. वाल्मिक काकडे, दत्तात्रय बर्गे, अतुल कोताडे, संजय राऊत, वैशाली ठाणगे, बाळासाहेब सोमासे उपस्थित होते.

...............

Web Title: Honor of retired members of Shikshak Bank