नवोदय, सैनिक स्कूलसाठी पात्र विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:21+5:302021-04-09T04:21:21+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सिद्धेश क्लासेसच्या वतीने अखिल भारतीय सैनिक स्कूल व नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या यशस्वी ...

Honor of eligible students for Navodaya, Sainik School | नवोदय, सैनिक स्कूलसाठी पात्र विद्यार्थ्यांचा गौरव

नवोदय, सैनिक स्कूलसाठी पात्र विद्यार्थ्यांचा गौरव

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सिद्धेश क्लासेसच्या वतीने अखिल भारतीय सैनिक स्कूल व नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी पालकांचाही सन्मान करण्यात आला. सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल तांबे, ज्येष्ठ पत्रकार अनिल कांबळे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी दत्तात्रय घोरतळे आदींसह पालक, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी क्षितिज रवींद्र कळसणे, विनीत सुखदेव बावणे, युवराज सावता सुसे, अविष्कार आजिनाथ कांबळे व नवोदय विद्यालय नववीसाठी निवड झालेली विद्यार्थिनी दिव्या संतोष वीर आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पालक सावता सुसे यांनी आपला मुलगा राज्यात ओबीसी प्रवर्गातून तिसरा आल्याबद्दल डिजिटल क्लास सुविधेकरिता २१ हजार रुपयांची मदत क्लासच्या संचालिका ऊर्मिला कुशाबा पलाटे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अमृत मराठे, संदीप कातकडे, रावसाहेब पलाटे, शिक्षिका प्रीती केदार आदींसह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन अवधूत केदार यांनी केले. कुशाबा पलाटे यांनी आभार मानले.

Web Title: Honor of eligible students for Navodaya, Sainik School