शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचा इतिहास पराक्रमाचा

By admin | Updated: December 24, 2015 23:38 IST

संगमनेर : मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या थोर पराक्रमाचा असून तो जाणीवपूर्वक समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

संगमनेर : मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या थोर पराक्रमाचा असून तो जाणीवपूर्वक समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा रविवारी पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर प्रकाश बर्डे, प्रा. ओंकार बिहाणी, डॉ. संतोष खेडलेकर, अनिल राठी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याचा स्वभाव नव्हता. परंतु मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा, या उद्देशाने ‘पानिपत’ कादंबरी लिहिली. माझ्या साहित्यात गणगोतातील जवळच्या व्यक्तीरेखा सापडल्या. ‘झाडाझडती’च्या रुपाने गावच्या लोकजीवनाचे वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केला. गावाकडच्या मातीत स्वत:चे बाळंतपण स्वत:च करून दगडाने नाळ तोडणारी स्री पाहिली. मराठी भाषा ही उत्तम असून व्यक्तीरेखेप्रमाणे ती बदलल्यास साहित्य दर्जेदार बनते. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. केसभराच्या चुकीला देखील त्यात माफी नसते. गिरणी कामगारांचे वास्तव ‘लस्ट फॉर लालबाग’ मधून लिहिले. सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तववादी जीवनावरील ‘महानायक’ कादंबरीची निर्मिती झाली. संभाजीराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘संभाजी’ कादंबरी लिहिली. साहित्यिकाने सत्य मांडताना कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मात्र त्याचा विचार करू नये. प्रशासकीय अधिकारी असल्याने येणाऱ्या लोकांच्या तक्रारीतील भाषेचा साहित्यात उपयोग करता आला, असे सांगत पाटील यांनी आपल्या साहित्य प्रवासाचे वर्णन केले. व्याख्यानास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)