शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान अ‍ॅग्रो देशात ठरला आदर्श प्रकल्प

By admin | Updated: July 30, 2014 00:45 IST

राहुरी : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला रास्त किंमत मिळावी व ग्राहकांनाही ती वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्रीय समितीने देशातून आठ आदर्श शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड केली.

राहुरी : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला रास्त किंमत मिळावी व ग्राहकांनाही ती वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्रीय समितीने देशातून आठ आदर्श शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातून वरवंडी (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील हिंदुस्थान अ‍ॅग्रो प्रकल्पाची निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आठ मंत्र्यांची एक समिती या प्रकल्पांच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आली. समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ़ एस़ पी़ सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच वरवंडी येथे येऊन हिंदुस्थान अ‍ॅग्रो प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ भारत ढोकणे यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली. सिंग म्हणाले की, देशात आठ राज्यात आठ शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून हिंदुस्थान अ‍ॅग्रोला स्थान देण्यात आले आहे. अन्नधान्य व शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे़ त्यादृष्टिकोनातून सहकारी तत्वावरील प्रक्रि या उद्योगांची निवड करण्यात आली आहे़हिंदुस्थान प्रकल्पामध्ये वि-किरण प्रक्रियेद्वारे कृषी माल दीर्घकाळ टिकतो. शेतकऱ्यांच्या मालासाठी प्रकल्प खुला करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासन प्राधान्य देईल, असे डॉ़ सिंग यांनी स्पष्ट केले़ ढोकणे यांनी कांदा साठवणूक गोदाम व प्रकल्पातून एक कंटेनर नुकताच परदेशात रवाना केल्यासंदर्भात माहिती दिली़ यावेळी आऱ श्रीकांत, अनिल सोनार, दत्ता खुळे, श्रीकृष्ण राजदेव, शांताराम खंडागळे, गोरक्षनाथ मोरे उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)शेतीमालाला योग्य दर मिळावे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक राज्यात प्रकल्प उभे राहणार आहेत़त्यादृष्टिकोनातून हिंदुस्थान अ‍ॅग्रोची निवड करण्यात आली आहे़ शेतमालाची योग्य पध्दतीने साठवण होईल़ त्यातुन नासाडीला आळा बसेल़ केंद्र शासनाबरोबरच शास्त्रज्ञ डॉ़अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ सहकारी तत्वावरील हा प्रकल्प पथदर्शक ठरेल़- डॉ़ भारत ढोकणे, अध्यक्ष हिंदुस्थान अ‍ॅग्रो.