सांगलीकरांना एनएसएसकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:06+5:302021-08-13T04:26:06+5:30
अहमदनगर : एनएसएसओ या संस्थेने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यावेळी कारंदवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, ...

सांगलीकरांना एनएसएसकडून मदतीचा हात
अहमदनगर : एनएसएसओ या संस्थेने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
यावेळी कारंदवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, एनएसएसओ सांगली जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या माध्यमातून तेथील पूरग्रस्त भागाची माहिती मिळवली. अहमदनगरमधील एनएसएसओ आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक व पदाधिकारी मदतीसाठी पुढे आले. त्यांनी नगर जिल्ह्यातून १२० कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे, किराणा किट तयार करून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी हाळमधील पूरग्रस्त ग्रामस्थांना मदत पोहोच केली. मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या संस्थेचे आभार मानले. यावेळी एनएसएसओ राज्य उपाध्यक्ष सूरज माळी, सचिव दत्तात्रय जांबले पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग काळे व सहकारी स्वयंसेवक उपस्थित होते. ही संस्था विविध आपत्तीच्या ठिकाणी मदत, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबविते.
----
१२ नगर मदत