शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवकाच्या कुटुंबियांना ‘प्रहार’कडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST

अहमदनगर : मूळचा पाथर्डी तालुक्यातील असलेल्या युवकाची औरंगाबाद येथे हत्या करण्यात आली. प्रहार जनशक्ती संघटनेने या तरुणाच्या कुटुंबियांची भेट ...

अहमदनगर : मूळचा पाथर्डी तालुक्यातील असलेल्या युवकाची औरंगाबाद येथे हत्या करण्यात आली. प्रहार जनशक्ती संघटनेने या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

पाथर्डी तालुक्यातील हरीचा तांडा येथील विकास चव्हाण याची ९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे निर्घृण हत्या करण्यात आली. विकास हा बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेला होता. तेथे हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. विकासच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरासाठी विकासच कर्ता होता. तो गेल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार, अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रवक्ते संतोष पवार व जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी नुकतीच या कुटुंबाची सांत्वनपर भेट देऊन दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाईसाठी औरंगाबाद येथे पाठपुरावा सुरू केला आहे, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा सचिव प्रकाश बेरड उपस्थित होते.

--------------

फोटो मेल वर

१५ प्रहार मदत

औरंगाबाद येथे हत्या झालेल्या पाथर्डी तालुक्यातील तरुणाच्या कुटुंबियांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत केली. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, लक्ष्मण पोकळे, प्रकाश बेरड, आदी उपस्थित होते.