शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्याबाबत प्राधिकरणाची सुनावणी

By admin | Updated: November 6, 2014 14:39 IST

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनी गोदावरी खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी वाटप होण्याबाबत प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे. श्रीरामपूरचा अशोक सहकारी साखर कारखान्यासह कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचे भाऊसाहेब दौंड, दशरथ पिसे या शेतकर्‍यांसह एकूण १७ जण याचिकादार, सहयाचिकादार आहेत. 
१९ सप्टेंबरला प्राधिकरणाने औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात संबंधित मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्यासोबत जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. तसेच महामंडळाने १४ ऑक्टोबरला राज्य सरकारकडे काही मुद्यांबाबत स्पष्टीकरण मागविले होते. त्यावर राज्य सरकारने स्वत:चे मत न देता उलटपक्षी महामंडळास
प्राधिकरणाकडूनच स्पष्ट आदेश मिळविण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार महामंडळाने प्राधिकरणास २७ ऑक्टोबरला याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने येत्या ११ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता याबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे अहमदनगर जिलतील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह, साखर कारखाने व इतर पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.