शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेचे प्रमुख पोखरणा, बोरगे वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

अहमदनर : कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिकारीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील ...

अहमदनर : कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिकारीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव थेट आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कारवाईची नोटीस बजावली गेली आहे. आरोग्य विभागाच्या दोन्ही प्रमुखांवर आरोग्य विभाग कारवाई करणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त झाले आहेत. अशावेळी आरोग्य यंत्रणेकडून सामान्यांना अपेक्षा असते. परंतु, ही यंत्रणा चालविणारे प्रमुख अधिकारीच कसे बेफिकीर आहेत, हे दोन वेगवेगळ्या घटनांतून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही बैठक आरोग्य विभागाशी संबंधित होती. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सक या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे पंतप्रधानांसमोर सादरीकरण करताना जिल्हाधिकारी भोसले यांना अडथळे आले. अशा बेफिकीर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी कणखर भूमिका भोसले यांनी घेतली. तसा प्रस्तावही त्यांनी आरोग्य विभागाला पाठविला. हे प्रकरण गाजत असतानाच दुसरे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त दालनातील खुर्चीत बसून गाणे म्हणत असल्याचा बोरगे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल घेऊन आयुक्त शंकर गोरे यांनी बोरगे यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशायाची नोटिस धाडली. परंतु, पुढे काय झाले हे ते आयुक्त गोरे व बोरगे यांनाच माहीत. ही घटना ताजी असतानाच मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यानेही नियम पायदळी तुडवित आरोग्य केंद्रात केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आरोग्य विभाग चांगलाच चर्चेत आला. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य जितके सामान्य नागरिकाला आहे, त्यापेक्षाही अधिक आरोग्य यंत्रणेला आहे. परंतु, अशा काळात हे अधिकारी इतक्या बेफिकिरीने कसे वागू शकतात, त्यांना कुणाचे पाठबळ आहे, यासह एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

....

मंत्री, खासदार आमदारांचीही चुप्पी

कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि अपुरे मनुष्यबळ, यामुळे आधीच आरोग्य यंत्रणा हतबल आहे. अशाही परिस्थितीत आरोग्याचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु,यंत्रणेचे प्रमुख अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडलेले असताना जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार याबाबत एक चकार शब्द बोलताना दिसले नाहीत. लोकप्रतिनिधी अशा बेफिकीर अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

....

आरोग्यमंत्री आले आणि गेले

आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या शनिवारी नगर शहरातून गेले. ते काहीवेळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. आरोग्यमंत्री टोपे यांच्या धावत्या दौऱ्यात हा विषय चर्चिला गेला नाही. त्यामुळे थेट कारवाईबाबत कोणताही निर्णय झाला नाही.