अग्रलेख प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:27+5:302021-09-24T04:24:27+5:30
-------------- ‘शिर्डी संस्थान हाजीर हो’ हा ‘लोकमत’मधील दि. २३ सप्टेंबर रोजीचा अग्रलेख वाचला. इतरत्र क्वचितच उपस्थित केले जाणारे मुद्दे ...

अग्रलेख प्रतिक्रिया
--------------
‘शिर्डी संस्थान हाजीर हो’ हा ‘लोकमत’मधील दि. २३ सप्टेंबर रोजीचा अग्रलेख वाचला. इतरत्र क्वचितच उपस्थित केले जाणारे मुद्दे या अग्रलेखात होते. ‘लोकमत’ दैनिकाच्या पत्रकारितेच्या निर्भीडतेचे मन:पूर्वक कौतुक केले पाहिजे. खरेच आम्हाला (म्हणजे सामान्य माणसांना) समजत नाही की, शिर्डी येथील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात अशी काय गंमत, जादू किंवा संधी आहे की लोकांनी तिथे जाण्यासाठी एवढा आटापिटा करावा. संस्थानमधील नियुक्त्यांचा वाद वारंवार न्यायालयात जातो. बाबांच्या समता, सबुरीचा उपदेश डावलून संस्थानमध्ये नेमणुका होतात. बाबांच्या देवळाचे पूर्ण राजकीयीकरण झाले आहे. कुणालाच जनमनाची नसावी, अशा कितीतरी गोष्टी विद्रुप दिसतात. होय, थोड्याच दिवसांत हे देऊळ मालकीचेसुद्धा होऊ शकेल. येथील चुकीचे पायंडे मोडण्यासाठी भक्त काही करू शकतील हे दुरान्वयानेही शक्य नाही. बाबा, आता तुझे पावित्र्य राखण्यासाठी जनतेला शक्ती दे. तुझ्या दानपेटीत आम्ही आमच्या घामाचे थेंब टाकू, या पलीकडे आम्ही काय सांगू शकतो. ‘लोकमत’ने आज अनेकांच्या डोळ्यांत अग्रलेखाद्वारे अंजन घातले आहे.
-शांताराम गजे, अकोले, जि. अहमदनगर