सोबत दारू पिले, भांडण झाल्याने कामगाराला संपविले

By अण्णा नवथर | Updated: December 9, 2023 15:57 IST2023-12-09T15:56:19+5:302023-12-09T15:57:11+5:30

दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

He drank alcohol with them, due to a fight the worker was killed | सोबत दारू पिले, भांडण झाल्याने कामगाराला संपविले

सोबत दारू पिले, भांडण झाल्याने कामगाराला संपविले

अहमदनगर: सोबत दारू पिले. दारू पिताना त्यांच्यात भांडण होऊन एकाने परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात लाकूड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागापूर एमआयडीसीत घडली. दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ओमप्रकाश राबचना महतो ( वय ३० वर्षे, रा. बिहार ) असे गुन्ह झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी विश्वास नामदेव गायकवाड ( वय २४ वर्षे, रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी ), अक्षय उफ शंभो प्रकाश सकट ( वय २३ वर्षे, रा. पिंपळगाव कौडा, राहुल संभाजी धोत्रे ( वय २६ वर्षे, रा. बजाजनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी ओमप्रकाश महतो यांचा पाठीमागून वार करून खून केला होता. याप्रकरणी त्यांच्या पत्नी दुर्गादेवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी गुन्ह्याचा तपास केला. तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा वरील आरोपी केल्याचे समोर आले. आरोपी हे तपाेवन रोडने येणार असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकले.

Web Title: He drank alcohol with them, due to a fight the worker was killed