शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ डॉक्टर अखेर निलंबित

By admin | Updated: December 16, 2015 23:08 IST

शिर्डी : कमिशनसाठी रुग्णाला लावण्यात आलेली आॅक्सिजनची नळी उपसणाऱ्या त्या डॉक्टराला व्यवस्थापनाने अखेर काल घरचा रस्ता दाखवला़

शिर्डी : कमिशनसाठी रुग्णाला लावण्यात आलेली आॅक्सिजनची नळी उपसणाऱ्या त्या डॉक्टराला व्यवस्थापनाने अखेर काल घरचा रस्ता दाखवला़ या डॉक्टराला निलंबित करण्यात आले असून अशाच प्रकारच्या आरोपांच्या घेऱ्यात असलेल्या अन्य दोन डॉक्टरावरील कारवाईचा प्रस्ताव व्यवस्थापनाच्या आगामी बैठकीत ठेवण्यात येणार आहे़ साईबाबा रुग्णालयातील एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात एका मुंबईच्या भाविकाला उपचारासाठी नाशिकला नेण्याचा आग्रह केला होता़ ठराविक रुग्णालयातच या पेशंटला न्यावे असा त्याचा हट्ट होता़ मात्र नातेवाईकांनी अन्य रुग्णालयात नेणार असल्याचे सांगितल्याने त्याने कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधील रुग्णाला लावण्यात आलेली आॅक्सिजनची नळीच उपसून घेतल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी साई संस्थान व रुग्णालय प्रशासनाकडे केलेली होती़ रुग्णांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेला व सार्इंच्या रुग्णसेवेला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराबाबत माध्यमांनीही आवाज उठवला होता़ शहरातील सचिन तांबे, सर्जेराव कोते, सचिन शिंदे, प्रमोद गोंदकर, दीपक वारूळे, नितीन कोते, राजेंद्र गोंदकर, भाऊ भोसले, किरण कोते, वैभव कोते आदींनी प्रशासनाला निवेदन देवून या डॉक्टरांवरील कारवाई करण्याची मागणी केली होती़ त्या अनुषंगाने काल व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत या डॉक्टरला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ विशेष म्हणजे डॉक्टर व औषधांचा तुटवडा यामुळे होणारे गरीब रुग्णांचे हाल, पिळवणूक या प्रकाराकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधले गेले़ या संवेदनशील विषयावर येत्या २८ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णयच संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी व जिल्हाधिकारी तसेच समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले़ यामुळे रुग्णालयाच्या अनेक दिवसांपासून व्यवस्थापनासमोर रखडलेल्या प्रस्तावांना चालना मिळण्याची व रुग्णालयाची घडी पुन्हा बसण्याची चिन्हे आहेत़ (तालुका प्रतिनिधी)