मर्चंटस् बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी हस्तीमलजी मुनोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:02+5:302021-09-23T04:24:02+5:30

याप्रसंगी चेअरमन अनिल पोखरणा, प्रभारी चेअरमन सुभाष बायड, संचालक सीए आयपी अजय मुथा, संजय बोरा, सीए मोहनलाल बरमेचा, विजय ...

Hastimalji Munot as the Chairman of the Board of Management of Merchants Bank | मर्चंटस् बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी हस्तीमलजी मुनोत

मर्चंटस् बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी हस्तीमलजी मुनोत

याप्रसंगी चेअरमन अनिल पोखरणा, प्रभारी चेअरमन सुभाष बायड, संचालक सीए आयपी अजय मुथा, संजय बोरा, सीए मोहनलाल बरमेचा, विजय कोथिंबीरे, संचालिका मीना मुनोत व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, असिस्टंट मॅनेजर सुरेश फिरोदिया, अतुल शिंगी उपस्थित होते.

यावेळी चेअरमन अनिल पोखरणा यांनी स्वागत केले. ते म्हणाले, मर्चंटस् बँकेचे सर्वेसर्वा हस्तीमल मुनोत यांचे दूरदृष्टी नेतृत्व व शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे मर्चंटस् बँक दिवसेंदिवस प्रगती करत आहे. त्यांची ही निवड बँकेसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

श्री. हस्तीमलजी मुनोत यांच्यासह बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांचा सत्कार बँकेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला. (वा. प्र.)

---

फोटो- २२ मर्चंट बँक

मर्चंटस् बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत व सदस्यपदी कमलेश भंडारी, ॲड.शरद पलोड, नरेंद्र लोहाडे, राजेश झंवर यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन अनिल पोखरणा, प्रभारी चेअरमन सुभाष बायड आदी उपस्थित होते.

Web Title: Hastimalji Munot as the Chairman of the Board of Management of Merchants Bank