शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट अनुदान जनतेच्या डोळ्यात धूळफेक

By admin | Updated: June 6, 2014 13:39 IST

केंद्र आणि राज्य सरकारने गारपीटग्रस्तांना केलेली मदत, दिलेले अनुदान ही जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री गोविंदराव आदिक यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : केंद्र आणि राज्य सरकारने गारपीटग्रस्तांना केलेली मदत, दिलेले अनुदान ही जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. अन्न सुरक्षा योजनेचा प्रभाव किती पडला हेच कळाले नाही. यामुळे योजनेचे नव्याने मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री गोविंदराव आदिक यांनी व्यक्त केले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आदिक बोलत होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने स्पष्ट कल दिलेला आहे. त्यावर चर्चा करणे चुकीचे असून जनतेच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. आठ दिवसात त्यांच्या कामाचे मूल्यमापन होता कामा नये. लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या अजेंड्यातून शेतकरी आणि कामगार गायब होते. ना सत्ताधारी ना विरोधक यापैकी कोणीच या दोन्ही घटकांकडे लक्ष दिलेले नाही. विरोधक तर पराभवाने पुरते खचून गेले असून यामुळे महाराष्ट्र कृषक समाज या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे आदिक यांनी स्पष्ट केले.कृषक समाज संघटना ही बिगर राजकीय संघटना असून त्यात केवळ सामान्यांचे हित पाहण्यात येणार आहे. यासाठी वेळप्रसंगी राज्यातील सत्ताधार्‍यांशी वैचारिक संघर्ष करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच राज्यातील सर्व पदाधिकार्‍यांचे दोन दिवस मंथन शिबिर नेवासा तालुक्यातील देवगड या ठिकाणी घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी भ्रष्टाचार, महागाई, रस्ते, मध्यमवर्गीय यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. मात्र, शेतकरी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांच्या आत्महत्येवर कोणीच बोलले नाहीत. यामुळे आपण कृषक समाजाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी दादा कळमकर, विनायक देशमुख, डि. एम. कांबळे, वसंत मनकर आदी उपस्थित होते..................शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर पक्षाच्या व्यासपीठावर मांडले होते. मात्र, त्यास पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या जाहीरनाम्यात या दोन घटकांना प्राधान्य मिळाले नसल्याने आता वेळ आल्यास काँग्रेस आणि स्व पक्षासोबत वैचारिक पातळीवर लढणार असल्याचे आदिक म्हणाले...............राज्यातील सत्ताधार्‍यांना प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी व्यासपीठ आहे. सरकार योजनेची घोषणा करते. मात्र, तळागाळाजील यंत्रणा काम करत नाही. हाच अनुभव राजीव गांधी जीवनदायी योजना आणि अन्य योजनांच्याबाबत आला आहे...................