आरंभ कॅन्सर सेंटरतर्फे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:33+5:302021-02-05T06:28:33+5:30

अहमदनगर : जागतिक कॅन्सर दिनानिमित्त (दि. ४ फेब्रुवारी) विविध कलागुणांना वाव मिळावा, कॅन्सर या आजाराबाबत सकारात्मक विचार समाजात रूजावा ...

Guidance from the Early Cancer Center | आरंभ कॅन्सर सेंटरतर्फे मार्गदर्शन

आरंभ कॅन्सर सेंटरतर्फे मार्गदर्शन

अहमदनगर : जागतिक कॅन्सर दिनानिमित्त (दि. ४ फेब्रुवारी) विविध कलागुणांना वाव मिळावा, कॅन्सर या आजाराबाबत सकारात्मक विचार समाजात रूजावा म्हणून आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर सेंटर २०१७ पासून कॅन्सरविषयी जागृती करत आहे. रुग्णाचे कुटुंब शेवटच्या टप्प्यात रुग्णाची काळजी घेऊ शकत नाही, तेव्हा आरंभ पॉलिएटिव्ह गृहभेटी करून किंवा त्यांना केडगाव येथील पॉलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये दाखल करून रुग्णाची देखभाल केली जाते. ‘आय लव्ह नगर’ ॲपद्वारेही कॅन्सरबाबत जागृती केली जाते. तसेच कॅन्सर दिनाचे औचित्य साधून दरवर्षी रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आय लव्ह नगर यांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा चार गटांत असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू आरंभ डॉट एसव्हीव्हीपी डॉट इन’ या संकेतस्थळावर २ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारीला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

Web Title: Guidance from the Early Cancer Center