DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:12 IST2025-02-25T22:23:53+5:302025-02-25T23:12:14+5:30
Maharashtra DA Hike: शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात राज्य सरकारने सुधारणा करत तीन टक्के वाढ केली असून असा आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव वि. अ. धोत्रे यांनी काढला आहे.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार
- प्रशांत शिंदे
अहिल्यानगर - शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात राज्य सरकारने सुधारणा करत तीन टक्के वाढ केली असून असा आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव वि. अ. धोत्रे यांनी काढला आहे.
शासने आदेशात म्हटले की १ जुलै २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतरसंरचेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर ५० टक्क्यांवरुन ५३ टक्के करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत थकबाकीसह फेब्रुवारीच्या वेतनात जमा होणार आहे.