शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांचे ‘गुगल मॅपिंग’

By admin | Updated: June 17, 2016 23:33 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांचे गुगल मॅपिंग करण्यात येणार असून, निवडणुकीच्यादृष्टीने केंद्र सक्षम करण्यात येतील

िअहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांचे गुगल मॅपिंग करण्यात येणार असून, निवडणुकीच्यादृष्टीने केंद्र सक्षम करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार यादी अद्ययावतीकरण सुरू करण्यात आले आहे़ निवडणुकीच्या प्रारुप मतदारयादीत ८९ हजार ८७२ मतदार असून, त्यापैकी ७ हजार ८७२ मतदार वगळण्यात आले आहेत़ त्याचबरोबर नव्याने १६ हजार मतदारांचा समावेश झाला आहे़ यापैकी ८ हजार ८२२ मतदारांच्या १ ते २० मुद्यांची माहिती प्रशासनास प्राप्त झाली असून, उर्वरित मतदारांना माहिती देण्यासाठी २५ जून अंतिम मुदत आहे़ त्यापूर्वी माहिती घेण्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी मतदारांच्या घरोघरी जावून माहिती घेणार असल्याचे कवडे म्हणाले़ पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसोबतच राष्ट्रीय मतदार यादीच्याही शुद्धीकरणाची मोहीम १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात सुरू होणार आहे़ मतदारयादीतील मयत, स्थलांतरीत, दुबार मतदारांचा शोध घेऊन ही नावे वगळण्यात येणार आहेत़ मतदारांचे छायाचित्र दुरुस्त करणे, नाव, वय, स्वाक्षरी, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक यांसारख्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर १८ ते १९ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नावनोंदणी करण्यात येणार आहे़
मतदान केंद्रांतील सुसूत्रीकरण
जल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार ५६७ मतदान केंद्र आहेत़ केंद्रांच्या हद्दी निश्चित करणे, नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करणे, केंद्रांवरील सुविधा, सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना, पोलीस ठाणे यांसारख्या सुधारणा करण्यात येणार आहेत,तसेच अक्षांश व रेखांश विषयक माहिती, मतदान केंद्राचा डिजिटल नकाशा, गुगल मॅपिंग, या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अपलोड करणे व हद्दी निश्चित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़
पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदारयादीतील मतदारांनी १ ते २० मुद्यांची माहिती सादर करून प्रशासनास सहकार्य करावे.
-अनिल कवडे, जिल्हाधिकारी
या चुका होणार दुरुस्त
नाव किंवा अपूर्ण आडनाव असणे
यादीतील भाग क्रमांक नसणे
विभाग क्रमांक नमूद नसणे
घरक्रमांकाचा उल्लेख नसणे
मतदाराचे नाते किंवा इतर चिन्हे
मतदाराच्या नातेवाईकाचे नाव नसणे
ओळखपत्र क्रमांक १० अंकांपेक्षा कमी असणे
वय १८ पेक्षा कमी असणे
ओळखपत्र दुबार असणे