कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:27+5:302021-04-16T04:20:27+5:30

२०२० या वर्षात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांचे पूर्ण वर्ष नुकसानीत गेले आहे. मागील वर्षात झालेले नुकसान भरून काढता काढता ...

Get an extension to pay the loan installments | कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी

कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी

२०२० या वर्षात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांचे पूर्ण वर्ष नुकसानीत गेले आहे. मागील वर्षात झालेले नुकसान भरून काढता काढता २०२१ आले. सर्वसामान्य व्यापारी कसाबसा या परिस्थितीशी झुंज देत व्यवसाय करीत होता. त्यात पुन्हा लॉकडाऊन पुकारल्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिक पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. सरकारच्या आवाहनाला दाद देत छोटे-मोठे व्यापारी आपले व्यवसाय बंद ठेवणार आहेत. व्यवसाय बंद ठेवूनदेखील दुकानातील वीज बिल, कामगारांचे पगार, जागेचे भाडे, व्यापारी देणे तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत. व्यवसाय बंद असल्यानंतर व्यापारी कुठलेही देयक भरू शकणार नाहीत. बँक कर्जाचे हप्ते देखील भरू शकणार नाहीत. व्यावसायिक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ते कर्ज खाते थकीत मध्ये जाणार आहे. कर्ज खाते थकीत गेल्यामुळे भविष्यकाळात व्यावसायिकांना बँका व्यावसायिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार आहेत. अशा व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी व संबधित कर्ज खाते थकीत मध्ये जाणार नाही अशी तरतूद करावी, अशी विनंती देवेंद्र लांबे यांनी केली आहे.

Web Title: Get an extension to pay the loan installments