शेवगाव : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात शेवगाव शहर व ग्रामीण भागात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे, नागरिकांनी साध्या पद्धतीने गणेशाचे विसर्जन केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री शिव छत्रपती बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठानने मूर्ती संकलन केंद्र हा स्तुत्य उपक्रम राबवत ५५० मूर्तींचे संकलन केले. संकलित झालेल्या मूर्तींची विधिवत पूजा करून जोहारापूर येथील नदीत विसर्जित करण्यात आल्या. नदीतीरावर ‘श्रीं’च्या विसर्जनाचा कार्यक्रम अत्यंत शांतपणे सुरळीत पार पडला.
९१ मंडळांनी गणेश स्थापना केली होती. त्यामध्ये ८५ सार्वजनिक तर १ खासगी मंडळाने सहभाग घेतला होता. ५ गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली. शहरातील मानाच्या लाटे गणेश उत्सव, भोईराज तरुण मंडळ, भगतसिंग मित्र मंडळ, टिळक तरुण मंडळ, वडार समाज मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, वाल्मीकी समाज मित्र मंडळ, अहिल्यादेवी तरुण मंडळ आदी मंडळांनी गणरायाला साध्या पद्धतीने निरोप दिला. सार्वजनिक मंडळांबरोबर घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिकऐवजी घरगुती गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. शेकडो गणेशमूर्ती नागरिकांनी दान केल्या.
200921\img-20210920-wa0022.jpg
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना चिमुकली.