शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 16:33 IST

Nilesh Lanke : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार निलेश लंके यांचाय आज गुंड गजा मारणेसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. लंके यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या.

Nilesh Lanke ( Marathi News ) :   'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार निलेश लंके यांचाय आज गुंड गजा मारणेसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. लंके यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान, सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका सुरू झाल्या. राजकीय वर्तुळातुनही जोरदार टीका सुरू झाल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका करत आरोप केले. दरम्यान, आता या टीकेला प्रत्युत्तर देत स्वत: खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेच्या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. 

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..

"काल मी दिल्लीचे काम करुन विमानतळावर उतरलो, त्यानंतर मी आमच्या ओळखीच्या पवार नावाच्या सहकाऱ्याला भेटायला गेलो. ती भेट झाल्यानंतर प्रवीण धंगे नावाच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलो.  त्यांच्या घराजवळून जात असताना आम्हाला काही लोकांनी थांबवलं त्यानंतर आम्ही थांबलो. त्यावेळी ते चहा घ्यायला चला म्हणाले. त्यावेळी आम्हाला कोणाची पार्श्वभूमी माहीत नव्हती. चहा पिलो, माझा सत्कार केला. नंतर मला काही वेळाने संबंधीत व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली. तो एक अपघात होता, असं स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिलं आहे. 

आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेवर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. आपलं जे आहे ते आम्ही मांडलं आहे. आता प्रत्येकाच्या टीकेवर बोलायचं का?, असा सवालही लंके यांनी केला. मी गुंडगीरीला विरोध करतो, आमच्या मतदारसंघात आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना स्थान दिलेलं नाही, असंही निलेश लंके म्हणाले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर ते काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यावेळी मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गजा मारणेच्या भेटीनंतर लंकेंवर टीकाटिपणी देखील होऊ लागलीये. भेट घेण्याचं कारण लंके यांनी सांगावं याबाबत राजकीय वर्तुळातून विचारणा होत आहे. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेस