शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाखांची शिर्डीत घरफोडी

By admin | Updated: April 15, 2024 14:29 IST

शिर्डी : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या साईनगर इमारतीत एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडेचार लाखांहून अधिक ऐवज चोरून नेला़

शिर्डी : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या साईनगर इमारतीत एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडेचार लाखांहून अधिक ऐवज चोरून नेला़ दुसऱ्या घटनेत सिंडीकेट बँकेतून एक लाखाची रोकड चोरट्यांनी पळविली. साईबाबा रूग्णालयाचे डॉ़ सचिन देशमुख हे संस्थानच्या साईनगर वसाहतीतील साईचिंतन-बी-२ या इमारतीत राहतात़ त्यांची पत्नीही साईबाबा रूग्णालयात स्टाफ नर्स आहे़ शनिवारी दुपारी हे दोघेही बाहेरगावी गेले होते़ रविवारी दुपारी जेव्हा त्यांची मोलकरीण घर स्वच्छ करण्यासाठी आली असता तिला घराचे कुलूप तोडलेले आढळले़ यानंतर तिने हे वृत्त शेजाऱ्यांना व तत्काळ डॉ़ देशमुख यांना कळवले़ यानंतर घर उघडून पाहिले असता कपाटातील सामानाची उचकापाचक करण्यात आली होती़ तसेच कपाटातील लॉकर तोडून सोळा तोळे सोन्याचे विविध दागिने गायब झालेले आढळले़ शिवाय एक कॅमेराही चोरीस गेला़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कहाळे पुढील तपास करत आहेत़ विशेष म्हणजे ज्या परिसरात ही चोरी झाली त्या परिसरात संस्थान सुरक्षारक्षकांचा वावर असतो़ तसेच बाहेरच्या बाजूने संरक्षक भिंतही आहे़ या पूर्वी या इमारतीत एक पोलीस उपअधीक्षक, तसेच एका शिक्षकाचीही अशीच घरफोडी झाली होती़ कोणीतरी पाळत ठेवून दिवसा हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे़ मात्र भरवस्तीत झालेल्या या घरफोडीने शहरात दहशतीचे वातावरण आहे़ (तालुका प्रतिनिधी)