शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या मिरवणुकीत मातीच्या बैलाला पहिला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी गावाने प्रत्येक सण, उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा अद्यापही कायम ...

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी गावाने प्रत्येक सण, उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा अद्यापही कायम ठेवली आहे. विशाल अशा मातीच्या बैलाला येथील पोळ्याच्या सार्वजनिक मिरवणुकीचा पहिला मान दिला जातो. ही परंपरा तब्बल ३८० वर्षांची आहे.

मातीच्या बैलाला देवाचा बैल समजून वादाला तिलांजली देत मिरवणुकीचा पहिला मान येथे दिला जातो. हनुमान दैवत हे बल आणि भक्तीचे मानले गेले आहे. येथील समर्थ हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना समर्थ रामदास स्वामी यांच्याहस्ते केल्याचे सांगितले जाते. श्रावणी दर्श अमावास्या ६ सप्टेंबर (सोमवार) सूर्यास्ताला हा आगळावेगळा पोळा सण यावर्षीही सार्वजनिकरित्या साजरा होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांनी दिली.

पोळ्याच्या दिवशी सायंकाळी गावातील शेतकऱ्यांचे सजविलेले बैल वाजत-गाजत मंदिर आवारात जमतात. देवासह बैलांचेही पाद्यपूजन करीत पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. मिरवणुकीत पुढे देवाचाच (मातीचा प्रतिकात्मक) बैल पुजाऱ्याच्या डोईवर असतो. मंदिर प्रदक्षिणा वाजतगाजत वेशीतील आंब्याच्या तोरणाखालून जाते. मगच सर्व शेतकरी आपल्या बैलाला नारळ फोडत मंदिर प्रदक्षिणा घालतात व घरी नेतात. घरच्या कारभारणीने बैलासह मालकाला ओवाळले की, मगच बैल दावणीला जातात. तेथेही त्यांना भाकरी गुळाच्या लाडूंची मेजवानी असते. असा पोळा रंगत जातो.

वादामुळे तालुक्यात वीस गावांतील पोळ्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतु, टाकळी येथे ही परंपरा आजही आनंदाने पाळली जात आहे.