शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुपा एमआयडीसीच्या जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

सुपा : बऱ्याच कालावधीनंतर पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे. मित्सुबशी बेलटिंग इंडिया हा ...

सुपा : बऱ्याच कालावधीनंतर पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे. मित्सुबशी बेलटिंग इंडिया हा जपानी उद्योग ३०० कोटी रुपयांची येथे गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी २० एकर जागेचा ताबा २३ जून रोजी घेतल्याची माहिती एमआयडीसीचे भूसंपादन अधिकारी रमेश बेल्हेकर यांनी दिली.

आतापर्यंत सुप्याच्या विस्तारित एमआयडीसीमध्ये मिंडा, कॅरिअर मायडिया, केएसपीजी या तीन मोठ्या कंपन्या आल्या आहेत. त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्या आणि बऱ्याच तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला. विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये जपानी पार्कसाठी स्वातंत्रपणे २१० एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली. परंतु, जपानी उद्योग न आल्याने ही जागा तशीच पडून होती. जपानी उद्योजकांनी यापूर्वी अनेक वेळा भेटी देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक परिस्थितीबाबत मिळालेल्या माहितीने जपानी उद्योजकांनी सुप्याकडे कानाडोळा केल्याचेही समजले. मध्यंतरी नवीन कारखान्यांच्या प्रशासनाला झालेला त्रास, गुंडगिरी, ठेकेदारीच्या कामावरून झालेले वाद, संघर्ष यामुळे जपानी उद्योजकांनी पाठ फिरवली होती. नंतरच्या काळात थेट वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली गेली. पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घातले व गुंडगिरी, दहशत यांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलली. त्यानंतर निर्भय वातावरण तयार झाल्याने आणि कंपन्या व स्थानिक नागरिक यांच्यातील विसंवादाची जागा संवादाने घेतल्याने आता जपानी कंपन्या येथे येण्याबाबत अनुकूल झाल्या. परिणामी मित्सुबशी बेलटिंग इंडिया ही जपानी कंपनी ३०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी २० एकर जागेचा ताबा त्यांनी घेतला आहे. या कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेस सुरुवात होण्यास जवळपास दोन वर्षे लागतील. या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज रिलेटेड या कारखान्यात दुचाकी व चारचाकी वाहनास लागणारे रबरी बेल्ट तयार होणार असल्याची माहिती कारखान्याचे सिनिअर जनरल मॅनेजर बाहुबली मक्कनवार यांनी दिली.

---

आणखी दोन कंपन्या येणार..

मित्सुबशी बेलटिंग पाठोपाठ आणखी दोन जपानी कंपन्याही येथे येणार आहेत. आयडियल प्लास्टो या जपानी कंपनीसह आणखी एका तिसऱ्या कंपनीनेही जागेसाठी सुपा एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले.

--

विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये नव्याने आलेल्या जपानी कंपन्यांचे स्वागत आहे. या कारखान्यांना लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांच्याबाबत गुंडगिरी व कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही.

-नीलेश लंके,

सदस्य, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ