शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याने घेतला अखेर मोकळा श्वास

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

पारनेर : तालुक्यातील जामगाव-सारोळा आडवाई रस्ता खासगी व्यक्तीने रस्त्यात दगड टाकून बंद केल्याने तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह, शाळा,

पारनेर : तालुक्यातील जामगाव-सारोळा आडवाई रस्ता खासगी व्यक्तीने रस्त्यात दगड टाकून बंद केल्याने तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह, शाळा, दळणवळण बंद झाल्याने संतप्त सारोळा आडवाईच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समितीत बांधकाम विभागाच्या विरोधात सुमारे पाच तास ढोल-ताशे बजाव आंदोलन केले. आंदोलनानंतर सायंकाळी बांंधकाम, महसूल, पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जामगावहून सारोळा आडवाईला मुख्य डांबरी रस्ता जातो. येथे आबुज वस्तीजवळ डांबरी रस्त्याच्या मध्यभागावर सुमारे तेवीस ट्रॅक्टर मुरूम व दगड टाकून मंगळवारपासून रस्ता बंद केला आहे. यामुळे मोठ्या वाहनांना हा रस्ताच बंद झाल्याने तेथून दळणवळणाच्या सुविधाही बंद झाल्या आहेत. गावात टँकरसह शाळांवरही परिणाम झाला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बुधवारी सारोळा आडवाई रस्त्याची पाहणी केल्यावर मुख्य व शासकीय रस्त्यावर खासगी व्यक्तीने अतिक्रमण केल्याने सारोळा आडवाईचे दळणवळण बंद झाल्याचा अहवाल दिला होता.दरम्यान, तीन दिवसांपासून रस्ता बंद असूनही बांधकाम विभागासह प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरूवारी बांधकाम विभागाचे अभियंता काकडे यांच्या दालनात आंदोलन केले. पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालय दणाणले होते. (तालुका प्रतिनिधी)रस्ता शुक्रवारी सकाळी मोकळा करून देण्यात येईल, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आश्वासन देणारे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता काकडे शुक्रवारी दुपारी ग्रामस्थ आल्यावर कार्यालयाच्या आवारातून पळून गेले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पारनेर बाजार समितीचे सभापती अरूण ठाणगे, सेनेचे नेते रामदास भोसले, माजी सरपंच देविदास आबुज, परशुराम फंड, डॉ. दत्तात्रय महांडुळे, मंगेश शिंदे, गणेश फंड यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्या व त्यांनी ढोल ताशांच्या वाद्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अतिक्रमण हटलेच पाहिजे, ग्रामस्थांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या.दरम्यान, रामदास भोसले, सभापती अरूण ठाणगे, पत्रकार विजय वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार भारती सागरे यांना माहिती दिली. त्यांनीही काकडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांनी फोनच बंद करून ठेवल्याने काकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.