शेतकऱ्याचा मुलगा बनला सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:02+5:302021-02-05T06:29:02+5:30
संगमनेर तालुक्यातील गणपिरदरा (आंबी खालसा) येथील कष्टकरी शेतकरी शिराजुद्दीन शेख यांचा सलीम हा मुलगा. सलीम याचे शिक्षण शेतकरी व ...

शेतकऱ्याचा मुलगा बनला सीए
संगमनेर तालुक्यातील गणपिरदरा (आंबी खालसा) येथील कष्टकरी शेतकरी शिराजुद्दीन शेख यांचा सलीम हा मुलगा. सलीम याचे शिक्षण शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबात झाले. शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहे. प्रभाकरराव भोर विद्यालय, आंबी खालसा येथे त्याने दहावीत ७५ टक्के गुण मिळवले. भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घारगाव येथून बारावीत ७० टक्के गुण मिळविले. संगमनेर कॉलेज येथे वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे येथे रवाना झाला. पुणे येथील खुटवड देवकर अँड कंपनी येथे सीएसाठी तीन वर्षे प्रशिक्षण घेतले.
सातत्य व कठोर परिश्रमाने ते अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत तो ४२१ गुणांनी उत्तीर्ण झाला. पुणे येथील सीए संतोष देवकर, यशवंत खुटवड व असीफ मुजावर यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, सलीम शेख याने सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन आई वडिलांच्या कष्टाला फळ मिळवून दिले आहे.
...............
अभ्यासात सातत्य ठेवले व कठोर परिश्रम घेतले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे कठीण नसते. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेऊनच तयारीला सुरुवात करावी.
- सलीम शेख