शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे गरजेचे

By admin | Updated: June 4, 2024 19:34 IST

संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने जिल्हा बँकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर, रामदास वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने उपस्थित होते. थोरात म्हणाले, शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून सव्वाशे कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवून निर्यात केली जाते. आगामी काळात रासायनिक खतांचा काळाबाजार व राजकारण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. बियाणे प्रक्रिया, कमीत कमी खताचा वापर यासाठी गावोगावी बैठकांद्वारे जनजागृती होण्याची गरज आहे. जिरायत भागात जलसंधारणाचे महत्व शेतकर्‍यांना पटवून दिले पाहिजे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून पीक विमा उतरविण्याचे आवाहन थोरात यांनी केले. तांबे यांनी ठिबक सिंचनाचे महत्व विषद करून महागाईमुळे शेतकर्‍यांनी स्वत: खत निर्मिती करण्याचे मत व्यक्त केले. बैठकीस प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, पद्मा थोरात, मिनाक्षी थोरात, अर्चना बालोडे, दिप्ती सांगळे, आरती दिघे, सुरेश थोरात, बाळासाहेब पवार, प्रभाकर कांदळकर आदी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)