शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुक्यातील शेतकरी झाला ‘हनीट्रॅप’ची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पती-पत्नीनेच हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याला दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पती-पत्नीनेच हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याला दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित शेतकऱ्याने रविवारी (दि.१८) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश छगन गिऱ्हे (रा. राघोहिवरे, ता. पाथर्डी) याच्यासह वडगाव गुप्ता येथील पती- पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत. फिर्यादी पीडित शेतकरी हा पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असून त्याचा शेतीसह पेेंटिंगचाही व्यवसाय आहे. आरोपी गिऱ्हे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. गिऱ्हे याने हनीट्रॅप करणाऱ्या महिलेला फिर्यादीचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यानंतर त्या महिलेने फिर्यादीला संपर्क करून त्याच्याशी मैत्री वाढवली. १५ जून रोजी सायंकाळी फिर्यादीस त्या महिलेने तिच्या वडगावगुप्ता येथील घरी बोलावून घेतले. तेथे त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढले. घरात हे दोघे एकत्र असतानाच त्यावेळी महिलेचा पती तेथे आला. फिर्यादी व महिलेला एकत्र पकडले असे भासवून फिर्यादीला घटनास्थळी लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडील ५ हजार रुपये हिसकावून घेत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी मध्यस्थी म्हणून गणेश गिऱ्हे याला बोलावून घेतले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादीकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे तीन धनादेश घेतले. तसेच २ लाख रुपयांची रोख खंडणी घेतली असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे पुढील तपास करीत आहेत.

-----------------

अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय

नगर तालुक्यातील जखणगाव व अकोले येथील हनीट्रॅपच्या घटना ताज्या असतानाच वडगावगुप्ता येथेही असाच प्रकार घडला आहे. त्या पती-पत्नीने अशाच पद्धतीने अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींना अटक झाल्यानंतर चौकशीतून अशा अनेक घटना समोर येण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.