शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची हकालपट्टी तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

कोतूळ : कोरोना संचारबंदीत कोतूळात एक अजब प्रकार समोर आला आहे. आठवडा बाजारच्या दिवशी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना गावाबाहेर ...

कोतूळ : कोरोना संचारबंदीत कोतूळात एक अजब प्रकार समोर आला आहे. आठवडा बाजारच्या दिवशी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना गावाबाहेर हाकलले तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा दिल्याने ग्रामसेवकांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोतूळात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आठवडा बाजार बंद होता. दोन महिन्यांपूर्वी हा बाजार सुरू झाला. दरम्यान, वर्षात कोतूळात भाजीपाला विकणारे किमान शेकडाभर नवीन व्यापारी तयार झाले. हे व्यापारी गावातील मोक्याच्या जागेवर चारचाकी गाड्या, हातगाड्या लावतात. दुप्पट नफ्याने भाजीपाला विकतात.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी व गर्दी नियंत्रण कायदा ग्रामपंचायत प्रशासनाने लागू केला. त्यामुळे आठवडा बाजार बंद केला. शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये, असे ग्रामसेवक व तलाठी व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरले. कडक अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, यात कोतूळ बाजारतळावर व्यापाऱ्यांचा दररोज भाजी बाजार सुरू झाला. किमान पन्नास व्यापारी येथे बसू लागले. शेतकरी आला तर त्याला जागाच मिळू दिली जात नाही. बसलाच कुठे तर ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी हाकलून देतात. शेतकरी त्यांचा भाजीपाला या व्यापाऱ्यांना अत्यंत कमी भावात देऊन घरी जातात. कमी भावात घेतलेला माल हे व्यापारी दुप्पट रकमेने विकतात. राजूर, अकोले येथे मात्र बाजारच्या दिवशी शेतकऱ्यांना बाजारात सामाजिक अंतर ठेवून जागा दिल्या जातात.

..............

बुधवारी आठवडा बाजारच्या दिवशी जवळे कडलग येथील एक शेतकरी सोनाका जातीची द्राक्ो पन्नास रुपये किलोने विकत होता. व्यापारी मात्र ऐंशी रुपयाने विकत होते. एक तासात या शेतकऱ्याला गावाबाहेर हाकलले. बोरी, वाघापूर येथील शेतकरी पंधरा रुपये किलोने बटाटा विकत होते. मात्र, शेतकरी हाकलल्याने बटाटा वीस ते पंचवीस रुपये झाला. टाेमॅटो पन्नास रुपये किलो, शेवगा ऐंशी, मिरची ऐंशी ते शंभर रूपये किलो झाली. धामणाव आवारी येथील एका शेतकऱ्याने ही मिरची चाळीस रुपये किलोने जागा नसल्याने विकली होती.

..............

कोतूळात गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना आठवडा बाजारात भाजीपाला घेऊन आले तर बसू दिले जात नाही. मात्र, बाजारतळावर व्यापाऱ्यांचा दररोज बाजार भरतो. बोरी येथील एक शेतकरी ढसढसा रडलेला मी पाहिला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देणार आहोत.

- गौतम रोकडे, शेतकरी, बोरी

फोटो - कोतूळ१,२