मोतीबिंदू शिबिरात ४४८ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:30+5:302021-02-13T04:21:30+5:30

फाऊंडेशनने केलेल्या अवयव दानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३७ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर ...

Examination of 448 patients in cataract camp | मोतीबिंदू शिबिरात ४४८ रुग्णांची तपासणी

मोतीबिंदू शिबिरात ४४८ रुग्णांची तपासणी

फाऊंडेशनने केलेल्या अवयव दानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३७ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी अभिषेक चिपाडे, डॉ. किरण कवडे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरूडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना येलुलकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म समभावाची शिकवण होती तर दुर्बल व वंचित घटकांना त्यांनी न्याय व आधार देण्याचे कार्य केले. या महापुरुषांच्या विचाराने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने नि:स्वार्थ भावनेने रुग्णसेवा घडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

फोटो १२ शिबिर

ओळी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव सप्ताहानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे आयोजित शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर.

Web Title: Examination of 448 patients in cataract camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.