शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

शनी शिंगणापूर देवस्थानचे अकरा विश्वस्त जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या अकरा विश्वस्तांच्या निवडीची घाेषणा सहाय्यक धर्मदाय आयुक्त हिरा शेळके यांनी बुधवारी ...

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या अकरा विश्वस्तांच्या निवडीची घाेषणा सहाय्यक धर्मदाय आयुक्त हिरा शेळके यांनी बुधवारी केली. मुलाखतीद्वारे विश्वस्तांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदासाठी लवकरच विश्वस्तांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची मुदत ५ जानेवारी २०२१ रोजी संपणार आहे. त्यापूर्वी विश्वस्त मंडळाची प्रशासनाकडून निवड करण्यात आली आहे. येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीचा बुधवार शेवटचा दिवस होता. गेल्या तीन दिवसांत विश्वस्त पदासाठी एकूण ८४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्यांतून अकरा जणांची निवड करण्यात आली. नेवासा तालुक्याचे नेतृत्व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे करीत आहेत. त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव सुचविले जाते, याची उत्सुकता आहे.

शिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. परंतु, तसा आदेश निघाला नाही. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी सर्वप्रथम सेनेला पाठिंबा जाहीर केला होता. गडाख हे सेनेकडून जलसंधारणमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारने शिंगणापूर देवस्थानबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. विद्यमान मंडळाची मुदत येत्या ५ जानेवारी रोजी संपणार आहे. विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. नवीन वर्षात मंडळाची मुदत संपत असल्याने नवीन मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. या ११ सदस्यांतून अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

...

-देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. परंपरा जपण्यासाठी गावकरी बिगर दरवाजाच्या घरात राहतात. जुन्या जाणत्या लोकांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती. ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. ‘पानस नाला’ प्रकल्पाचा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच येथील विकासासाठी विविध उद्योगपतींशी चर्चा सुरू आहे.

- शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री

...

हे आहेत निवड झालेले विश्वस्त

बाळासाहेब बन्सी बोरुडे, विकास नानासाहेब बानकर, छबुराव नामदेव भूतकर , पोपट लक्ष्मण कुऱ्हाट, शहाराम रावसाहेब दरंदले, भागवत सोपानराव बानकर, सुनीता विठ्ठल आढाव , दीपक दादासाहेब दरंदले, शिवाजी अण्णासाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे यांची मुलाखत होऊन नियुक्ती झाली आहे.