शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका संपल्या, विकासासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पोपट पवार व आमदार नीलेश लंके यांचा सत्कार ...

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पोपट पवार व आमदार नीलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. बबनराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच संभाजी गडाख, वसंतराव पवार, शिवाजी होळकर, दिलीप होळकर, राजेंद्र होळकर, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध आहेत. गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वित करून त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बंडू जपकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी साई संजीवनी प्रतिष्ठान देत असलेले सहयोग व सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय सीताराम जपकर यांनी करून दिला. यावेळी पद्मश्री पवार व आमदार लंके यांच्या हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक व शिक्षकांचा तसेच गावात आरोग्य चळवळ चालविणाऱ्या सपना वेलनेस सेंटरच्या टिमचा सन्मान करण्यात आला.

आमदार नीलेश लंके म्हणाले की, असंतुष्ट आत्मे व त्यांच्या व्यक्तीदोषामुळे राळेगण व हिवरेबाजारसारख्या गावात निवडणुका लागल्या. पारनेर मतदारसंघात असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपट पवार ही बलस्थाने असून, त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन एकनाथ होले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, उपाध्यक्ष छबूराव फुले, एकनाथ होले, बंडू जपकर, सीताराम जपकर, शांताराम साळवे, बबन कांडेकर, छबूराव जपकर, राजू भुजबळ, दादू चौघुले, गजानन होळकर, बाबासाहेब भोर, तानाजी सप्रे, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, मल्हारी कांडेकर, रामदास फुले, बाबासाहेब होळकर आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

--------

फोटो - आहे

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार नीलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.