हुंडाबळी प्रकरणी पतीसह सासूसासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:53+5:302021-06-04T04:16:53+5:30

तालुक्यातील पढेगाव शिवारात एका विहिरीत गुरुवारी २१ वर्षीय पूजा सागर मापारी या विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती ...

Dowry victim case filed against husband and mother-in-law | हुंडाबळी प्रकरणी पतीसह सासूसासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

हुंडाबळी प्रकरणी पतीसह सासूसासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

तालुक्यातील पढेगाव शिवारात एका विहिरीत गुरुवारी २१ वर्षीय पूजा सागर मापारी या विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मयताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्यूबद्दल संशय असल्याने मयतेच्या वडिलांनी विजय बाळकृष्ण भुजाडे (वय ४२, गोधेगाव, ता. कोपरगाव) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.

मयत पूजा हिचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर तिचा लगेचच मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. तिला सतत दमदाटी व मारहाण केली जात होती. तसेच पती सागर याचे विवाहबाह्य संबंध होते असे फिर्यादीत म्हटले आहे. सासरच्या व्यक्तींनी सतत पैशासाठी तगादा लावल्याचा आरोप मयत पूजा हिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे मयत ही तणावाखाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे अधिक तपास करत आहेत.

---

Web Title: Dowry victim case filed against husband and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.