शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर महिलेची आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

अहमदनगर: सारसनगर भागातील डॉ. सुजाता निलेश शेळके (वय ३८, रा. विश्वास नर्सिंग होम, मार्केटयार्डमागे, सारसनगर) यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली

अहमदनगर: सारसनगर भागातील डॉ. सुजाता निलेश शेळके (वय ३८, रा. विश्वास नर्सिंग होम, मार्केटयार्डमागे, सारसनगर) यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.१९) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. उपचार सुरू असताना डॉ. सुजाता यांचा मृत्यू झाला.डॉ. निलेश विश्वास शेळके यांचे मार्केटयार्ड भागात विश्वास नर्सिंग होम हे मोठे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री डॉ. सुजाता यांनी उडी घेतल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कोतवाली पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. त्यानंतर डॉ. सुजाता यांचे वडील अरुण भिला पाटील (रा. धुळे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादित म्हटले आहे की, डॉ. निलेश यांनी चारित्र्याचा संशय घेऊन, तसेच हॉस्पिटलसाठी घेतलेले कर्ज भागविण्यास माहेराहून १५ लाख रुपये आणावेत, या कारणासाठी डॉ. सुजाता यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळास कंटाळून डॉ. सुजाता यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी डॉ. निलेश शेळके, त्यांचे आई-वडील, त्यांचा कोपरगावस्थित एक नातेवाईक अतुल औताडे, कार ड्रायव्हर अब्दुल अझीज अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, डॉ. शेळके दाम्पत्याचे एकमेकांशी वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तशी नोटिसही डॉ. शेळके यांनी दिली होती.तेव्हापासून दोघे वेगवेगळे राहत होते. विश्वास नर्सिंग होमच्या इमारतीमध्ये दोन मुलींसह डॉ. सुजाता राहत होत्या. तर डॉ. निलेश शेळके हे माणिकनगर येथे राहत होते. काही महिन्यांपूर्वी छळ झाल्याने डॉ. सुजाता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र डॉ. शेळके यांच्या मित्रपरिवाराने मध्यस्थीने हे प्रकरण मिटविले. त्यानंतर शेळके दाम्पत्यानी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉ. सुजाता यांच्या आत्महत्येबाबत संशय निर्माण झाला आहे.