शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना होणारी धक्काबुक्की सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST

साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे एक डॉक्टर बुधवारी (दि. १४) राऊंड घेण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात ...

साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे एक डॉक्टर बुधवारी (दि. १४) राऊंड घेण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी हात पकडून धक्काबुक्की केल्याचा निंदनीय प्रकार घडला. या घटनेने संस्थानच्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, डॉक्टरांनी निषेध केला.

दरम्यान, राज्यात तसेच अहमदनगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. यामुळे नातेवाईकांचा राग अनावर होणे साहजिकच आहे. परंतु देवदूत म्हणून डॉक्टर, नर्सेस, ब्रदर आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. राज्य शासन वारंवार कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. डॉक्टर मंडळी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असलेल्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज आहे, असे कोते यांनी सांगितले.