शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरनगरीत घुमला ज्ञानोबा-तुकोबाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 12:13 IST

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़

आॅनलाइन लोकमतनेवासा, दि़ २० - आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष केला़ या जयघोषाने गुरुवारी आसमंत दुमदुमला़माऊलीच्या आषाढी वद्य कामीका एकादशीनिमित्त गुरुवारी पहाटे संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा संगीता बर्डे, दत्तात्रय बर्डे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शुभांगी पाटील यांच्या हस्ते माऊलीच्या ‘पैस’ खांबास अभिषेक घालण्यात आला.श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी पंचगंगा सिडस् व जयहरी परिवार, रवी तलवार, मुस्लिम समाजबांधव, मारुतराव घुले पतसंस्था, मध्यमेश्वर पतसंस्थेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो दिड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरापर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले़ दिवसभरात पाच लाखापर्यंत भाविकांची उपस्थिती येथे राहील, असे शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितले.