असंघटित कामगारप्रश्नी आयटक कार्यकारिणीत चर्चा

By Admin | Updated: September 21, 2016 00:27 IST2016-09-20T23:41:16+5:302016-09-21T00:27:22+5:30

अकोले : येत्या नोव्हेंबरमध्ये जळगाव, सांगली, वर्धा येथे असंघटित कामगारांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात आयटकच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत

Discussion in the Unorganized Worker's Tactical Issue | असंघटित कामगारप्रश्नी आयटक कार्यकारिणीत चर्चा

असंघटित कामगारप्रश्नी आयटक कार्यकारिणीत चर्चा


अकोले : येत्या नोव्हेंबरमध्ये जळगाव, सांगली, वर्धा येथे असंघटित कामगारांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात आयटकच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. ट्रेड युनियन सुधारण्याच्या नावाखाली भाजप सरकार कामगारांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणू पाहत असून येत्या काही दिवसात कामगारांचा लढा अधीक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तालुक्यातील डोंगरगाव येथे मंगळवारी ही बैठक झाली. आयटकचे राज्य सरचिटणीस शाम काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत झालेले निर्णय सांगितले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसळ (औरंगाबाद), कॉम्रेड शंकर पुजारी (सांगली), कॉम्रेड बबली रावत (मुंबई), कॉम्रेड माधुरी क्षीरसागर (परभणी), कॉम्रेड सुमन पुजारी (सांगली), कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कॉम्रेड राम बाहेती (औरंगाबाद), कॉम्रेड प्रकाश बनसोड, कॉम्रेड राजू देसले (नाशिक), कॉम्रेड नरेंद्र चंद्रय्या नोने (चंद्रपूर), कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली (नगर), कारभारी उगले, शांताराम वाळुंज आदी उपस्थित होते. दि.२४ व २५ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जळगाव येथे, दि.१५ व १६ आॅक्टोबर बांधकाम कर्मचाऱ्यांचे सांगली तेथे, तर १२ व १३ नोव्हेंबरला वर्धा येथे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून याबाबत विचारविनिमय करण्यात आला. असंघटित कामगारांचा लढा अधीक तीव्र करण्याबाबत ठराव संमत झाला. होणाऱ्या तीन राज्यस्तरीय अधिवेशानाची चर्चा झाली.
केंद्रातील व राज्यातील भाजप युतीचे सरकार भांडवलदारधार्जिणे असून त्यांच्या विरोधातील आक्रोश मोर्चे आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर दिसत आहेत, असे स्पष्ट करत राज्यात होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला आयटकचा जाहीर पाठिंबा असल्याचे मनोहर टाकसाळ, शाम काळे यांनी सांगितले. मूकमोर्चात सध्या राजकारणी घुसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी विडी कामगारांचे नेते कॉम्रेड कारभारी उगले यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Discussion in the Unorganized Worker's Tactical Issue