जिजाऊ ब्रिगेडच्या तळेगाव अध्यक्षपदी दिघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST2021-07-07T04:26:18+5:302021-07-07T04:26:18+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बिरोबा हॉस्पिटलच्या संचालिका राजश्री भरत दिघे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या तळेगाव दिघे ...

Dighe as the Talegaon president of Jijau Brigade | जिजाऊ ब्रिगेडच्या तळेगाव अध्यक्षपदी दिघे

जिजाऊ ब्रिगेडच्या तळेगाव अध्यक्षपदी दिघे

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बिरोबा हॉस्पिटलच्या संचालिका राजश्री भरत दिघे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या तळेगाव दिघे शाखाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे व उपाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी यांनी दिली.

संगमनेर येथे आयोजित बैठकीत जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा माधुरी भदाणे यांनी राजश्री दिघे यांना निवडीचे पत्र दिले. प्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष के. डी. पाटील, विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, विभागीय संघटक प्रमोद अहिरराव, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, संभाजी ब्रिगेड प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ. माणिकराव शेवाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, उपाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

.............

०५ राजश्री दिघे

Web Title: Dighe as the Talegaon president of Jijau Brigade