शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज रस्त्यावर

By admin | Updated: July 31, 2014 00:40 IST

श्रीरामपूर: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

श्रीरामपूर: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी श्रीरामपूरच्या गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत धनगर बांधवांनी श्रीरामपूरमधून शेळी मेंढ्यांसह काठी न् घोंगडं घेऊन फेरी मारली.मल्हार सेनेचे तालुका संघटक राजेंद्र पानसरे यांच्या नेतृत्वाखाली हे शहरातून फेरी मारल्यानंतर गांधी पुतळ्यासमोर धनगर बांधव उपोषणास बसले. बापू वडितके यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, पं.स. सदस्य वंदना राऊत, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, माजी सभापती इंद्रनाथ थोरात, सुनीता गायकवाड, माजी जि. प. सदस्य मिलिंद गायकवाड, अशोक बँकेचे उपाध्यक्ष किशोर फोफळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, लहू कानडे, नामदेवराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पाटील, सिद्धार्थ मुरकुटे, माजी नगरसेवक नजीर मुलानी, भारतीय धनगर महासंघाचे बबनराव कांदळकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, दत्तात्रय कांदे उपस्थित होते. पानसरे यांच्यासह ज्ञानेश्वर राऊत, अण्णा कांदळकर, विलास गोराणे, सुनील बंड, माजी उपसभापती सोपान राऊत, संजय राऊत, राजेंद्र पवार, शरद देवकर, भाऊराव सुडके , रामदास पवार, विजय पिसे, राजेंद्र तागड आदी उपोषणास बसले होते. शिर्डी : धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी राहाता तालुक्यातील धनगर समाजाच्या तरुणांनी बुधवारी शिर्डीत नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन केले़सध्या सुरू असलेल्या आंदोलनानंतरही सरकारने आरक्षणाच्या रूपाने आमचा हक्क आम्हाला दिला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ ज्ञानेश्वर सोडणार, दिलीप सातव, प्रदीप रानभोंडे, बाळासाहेब गिधाड, अंकुश भडांगे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते़दिलीप सातव यांनी सांगितले की,घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनीही उदरनिर्वाहासाठी दर्याखोऱ्यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजाचा आदीवासी समावेश करण्याचे निर्देश तत्कालीन सरकारला दिले होते़मात्र यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही आजवर अंमलबजावणी झाली नाही़ शिर्डीच्या नगराध्यक्षा अनिता जगताप, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींनी आंदोलनात सहभागी होवुन धनगर समाजाच्या मागणीचे समर्थन केले़रास्तारोको नंतर पोलीस निघून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी पिचड यांच्या पुतळ्याचे दहन केले व पद्मकांत वळवी व वसंतराव पुरके यांचाही निषेध केला. आंदोलनासाठी मेढ्यांही आणण्यात आल्या होत्या़पिचडांचा निषेधधनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यास आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी विनाकारण विरोध दर्शवून आमच्या समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे पिचड यांचाही आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने या प्रवर्गात समावेश न केल्यास राज्यातील आघाडी सरकारविरोधात मतदान करण्याची शपथही यावेळी आम्ही उपोषणकर्त्यांनी व समाजबांधवांनी घेतली.- राजेंद्र पानसरे, तालुका संघटक, मल्हार सेना, श्रीरामपूर.