शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

'ज्यांना तुप चोर म्हणाले, त्यांना उमेदवारी दिली', देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका 

By सचिन धर्मापुरीकर | Updated: May 9, 2024 16:17 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाऊसाहेब वाकचौरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, हा तुप चोर आहे. आता त्यांनाच उमेदवारी दिली. यात तुम्हाला कीती तुप मिळाले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

- सचिन धर्मापुरीकरकोपरगाव (जि. अहमदनगर)  - भाऊसाहेब वाकचौरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, हा तुप चोर आहे. आता त्यांनाच उमेदवारी दिली. यात तुम्हाला कीती तुप मिळाले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला. ज्यांच्यावर तुप चोर म्हणून टिका केली, त्यांचा प्रचारही ठाकरेंना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे महाविजय संकल्प सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, निलम गोऱ्हे, दादा भूसे, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब मुरकूटे आदींची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ५४२ खासदार आहेत. परंतू शिर्डीच्या खासदाराला देशभरात वेगळा मान आहे. ज्यावेळी तुम्ही खा. लोखंडे यांना मतदान कराल, त्याच वेळी शिर्डी मतदार संघाची बोगी मोदी यांच्या इंजिनला जोडली जाणार आहे. ही देशाची निवडणूक आहे. सर्वसामान्य लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा व विश्वात गौरव असलेले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करण्यासाठी लोखंडे यांना मतदान करण्याचे आवाहन करून केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

पश्चिमेचे पाणी या भागात आणूआ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेला आणून नगर, नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष कमी करावा, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निळवंडेच्या पोटचाऱ्याचे काम करणारच आहोत, या शिवाय पश्चिमेचे पाणी या भागात आणायचे आहे. या प्रकल्पास जल आयोगाची मान्यता घेतली आहे. लवकरच आराखडा तयार केला जाईल. या प्रकल्पाला ४० ते ५० हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. परंतू 'मोदी है तो मुमकीन है' या प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४