शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सुपा औद्योगिक पार्कचा आराखडा पुणे विभागाकडे

By admin | Updated: July 31, 2014 00:40 IST

अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे़

अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ नव्याने उभारण्यात येणाऱ्या पार्कमधील पायाभूत सुविधांच्या आराखड्यास नाशिक विभागाकडून बुधवारी मंजुरी देण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी तो पुणे विभागाकडे पाठविला जाणार आहे़ त्यामुळे सुपा औद्योेगिक विकासाला चालना मिळेल़सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करण्यात येत आहे़ औद्योगिक विकास महामंडळाने सप्टेंबर २०१० मध्ये बाबुर्डीसह सहा गावांतील जमिनी संपादन करण्याचा निर्णय जाहीर केला़ प्रशासनाच्या या निर्णयामुळे सहा गावांतील नव्याने ९२७ हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकणार आहे़ ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे़ श्रीगोंदा -पारनेर उपविभागीय कार्यालयाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ यापैकी ५०० एकर जमिनी जपानी उद्योगासाठी देण्याचे ठरले आहे़ जिल्ह्यात प्रथमच जपानी उद्योग येत असून, या उद्योगांसाठी स्वतंत्र पार्क उभारण्यात येणार आहे़ त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ पार्कचा २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ येथील उपविभागीय कार्यालयाकडून तो बुधवारी नाशिक येथे झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला़ किरकोळ सुधारणा करत कार्यकारी अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे़जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योगांची संख्या मोठी आहे़परंतु मोठे उद्योग नसल्याने ते अडचणीत आले आहेत़ त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीवर मंदीचे सावट पसरले आहे़ या उद्योजकांवर उत्पादन कमी करण्याची वेळ ओढावली आहे़ अर्थिक संकटात सापडलेल्या लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, यासाठी सुपा औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे़ वरिष्ठस्तरावर याबाबत बैठका सुरू असून, उद्योजकांशी चर्चा सुरू आहे़ सुपा येथे मोठे उद्योग आल्यास येथील लघु व मध्यम उद्योजकांना मोठ्याप्रमाणात काम मिळेल,अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे़ सुपा येथील पार्कचा आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ उद्योगक्षेत्राला चालना देणारा हा प्रस्ताव असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले़(प्रतिनिधी)सुपा-पारनेर औद्योगिक पार्कचा तयार केलेला आराखडा नाशिक विभागास सादर करण्यात आला़ त्यावर सकारात्मक चर्चा होऊन आराखडा पुणे विभागाकडे सादर केला जाणार आहे़-रमेश गुंड, उपअभियंता