शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

विविध पक्षांच्या २१ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

अहमदनगर: नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहर मतदारसंघातील युवक काँग्रेसचे उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह

अहमदनगर: नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहर मतदारसंघातील युवक काँग्रेसचे उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह जिल्ह्यातील २१ उमेदवारांना वैधानिक मतांच्या षष्टांश मते न मिळाल्याने त्यांची अनामत सरकार जमा होणार आहे़ यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाच यात समावेश असून, सर्वाधिक उमेदवार काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे आहेत़ तर मनसेच्या तिन्हीही उमेदवारांचा यात समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला़ मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, उमेदवार व त्यांना पडलेल्या मतांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे़ प्रशासनाच्या अहवालानुसार शहरासह जिल्ह्यातील २१ उमेदवारांना वैधानिक मतांच्या एक षष्टांशपेक्षाही कमी मते मिळाली आहेत़ आघाडी व महायुतीच्या फाटाफुटीमुळे चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते़ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांना ऐनवेळी सक्षम उमेदवार न मिळाल्याने मिळेल त्याला उमेदवारी देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले़ काही ठिकाणी बाहेरचे उमेदवार दिले गेले़ तसेच अनेकांनी बड्या नेत्यांना आव्हान देत निवडणुकीत उडी घेतली खरी, पण त्यांची अनामत रक्कम जमा झाली आहे़ अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे़ यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची अनाम जप्त होणे होणे ही शरमेची बाब समजली जात. मात्र, आता कोणालाच कशाचे घेणे-देणे नसल्याचे चित्र आहे. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पाथर्डी येथे सभा घेतली़ तरीही मनसे उमेदवारांना अनामतही वाचविता आली नाही.(प्रतिनिधी)