तातडीने पदाधिकारी निवड करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:54+5:302021-05-26T04:20:54+5:30

संस्थेचे अध्यक्ष विशाल पोफळे यांनी सचिव निलेश ओझा यांना संचालक मंडळ सभा घेण्याबाबत सूचना करणे आवश्यक होते. ती न ...

Demand for immediate selection of office bearers | तातडीने पदाधिकारी निवड करण्याची मागणी

तातडीने पदाधिकारी निवड करण्याची मागणी

संस्थेचे अध्यक्ष विशाल पोफळे यांनी सचिव निलेश ओझा यांना संचालक मंडळ सभा घेण्याबाबत सूचना करणे आवश्यक होते. ती न केल्यामुळे सभा झाली नाही. पदाधिकारी निवडीसाठी सभा घेण्यासंदर्भात अध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन बैठक घेण्यात येईल, असे संचालक सुनील गुप्ता यांनी सांगितले.

मर्चंटस् असोसिएशनची संचालक मंडळाच्या ५ जागेसाठी निवडणूक ॲड. प्रकाश बोकडीया यांनी घोषित केली. त्यानुसार २६ एप्रिलला मतदान होणार होते. मात्र कोविड महामारीमुळे निवडणूक स्थगित झाली. संचालक अमोल कोलते, विलास बोरावके, प्रवीण गुलाटी, विद्यमान अध्यक्ष विशाल पोफळे व वैभव लोढा यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाले आहेत.

संस्थेचे व्यवस्थापक अशोक महापुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वार्षिक सभेनंतर १ महिन्यात पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा घेणे आवश्यक आहे. पदाधिकाऱ्यांना तसे सूचित केले होते. परंतु अद्याप सभा घेतली गेली नाही असे सांगितले.

---

Web Title: Demand for immediate selection of office bearers