शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीचे ‘घट’ बसले!

By admin | Updated: September 26, 2014 00:17 IST

अहमदनगर : उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेसने अनपेक्षितपणे आघाडी घेतली.

अहमदनगर : उमेदवारांची यादी जाहीर करण्यात काँग्रेसने अनपेक्षितपणे आघाडी घेतली. नगर शहरातून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव अपेक्षेप्रमाणे पहिल्याच यादीत आले तर श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. दरम्यान, सेनेने श्रीरामपूरमधून उमेदवारी निश्चित केल्याचा दावा लहू कानडे यांनी केला आहे मनसेने ४ मतदारसंघात उमेदवार उतरविले आहेत. दरम्यान, उमेदवारीच्या घोषणांनी वेग घेतला. काँग्रेसची पहिली यादी बुधवारी उशिरा रात्री दिल्लीतून जाहीर झाली. त्यासोबतच जिल्ह्याचे राजकारण सचेत झाले. अपेक्षेप्रमाणे मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरसाठी तर राधाकृष्ण विखे यांचे शिर्डी मतदारसंघातून नाव निश्चित झाले. मात्र पहिल्याच यादीत नगर शहरातून सत्यजित तांबे यांचे नाव आल्याने चर्चा झाली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नगर शहरात याच विषयावर राजकारण ढवळून निघाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नगरचे राजकारण ढवळून निघाले आहे. गेल्या काही महिन्यापासून तळ ठोकून असलेले तांबे थेट उमेदवारीबाबत दावा ठोकत नसल्याने मध्यंतरी संभ्रम निर्माण झाला होता. नगर शहरात काँग्रेसच्या जनसमर्थनाला गेल्या काही वर्षात उतरती कळा लागली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत तांबे विधानसभेच्या तयारीला लागल्याने विविध चर्चाही फुटल्या होत्या. त्यातच पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोधाचा सूर लावला होता. या अडचणी पार करत तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर संग्राम जगताप मैदानात आहेत. त्यामुळे सेनेचे विद्यमान आ. अनिल राठोड यांना नव्या पिढीच्या तरुण नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. मनसेने शहरातून वसंत लोढा यांना उमेदवारी जाहीर केल्याने लढत पंचरंगी होणार आहे. श्रीरामपूरमधून आ. कांबळेंना काँग्रेसची उमेदवारी पुन्हा मिळणार का, अशी चर्चा होती. मध्यंतरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या साथीने ते सेनेत जातील, अशा वावड्याही होत्या. मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यासमोर कोण, हा प्रश्न गुरुवारी सायंकाळी सुटला. गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील असलेले साहित्यिक लहू कानडे यांना सेनेची उमेदवारी मिळाल्याचे वृत्त आहे. कानडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गुरुवारी सायंकाळी सेनेचा एबी फॉर्म घेवूनच आपण मातोश्रीच्या बाहेर पडलो, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)अकोले मतदारसंघात सेनेने मधुकर तळपाडे यांना उमेदवारी दिल्याचे वृत्त हाती आले होते. त्यामुळे सेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अशोक भांगरे यांनी तातडीने समर्थकांची बैठक घेतली होती.